देशी जुगाड; वडीलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून 8 वीतील विद्यार्थ्याने बनवली अनोखी सायकल

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. तुमच्याकडे इच्छाशक्ती असल्यास तुम्ही काहीही करू शकता. काहीशी अशीच कमाल पंजाबमध्ये 8वी मध्ये शिकणाऱ्या हरमनजोत सिंहने केली आहे. हरमनजोतने आपल्या वडिलांसोबत मिळून एक खास सायकल तयार केली आहे.

(सौजन्य – एएनआय)

पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील लख्खोवाल गावात राहणाऱ्या हरमनजोतला सायकल हवी होती. मात्र कोरोना व्हायरस महामारीमुळे त्याचे वडील त्याला नवीन सायकल घेऊन देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याने वडिलांसोबत मिळून स्वतःच एक नवीन सायकल तयार केली आहे. ही सायकल अगदी स्कूटर सारखी दिसते. सायकलचा पुढील भाग स्कूटर सारखा असून, पँडल मारून चालवता येते.

हरमनजोतने सांगितले की, त्याने ही सायकल स्वतः बनवली आहे. ही सायकल पाहून सर्वचजण हैराण होतात. मला सायकल चालवायला आवडते. या सायकलला तयार करण्यासाठी 15 दिवस आणि 10 हजार रुपये खर्च आला.