‘उल्लू’प्रमाणे बुद्धिमान आहेत ट्रम्प, हिंदीतून प्रचार करणे समर्थकाच्या अंगलट

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हेच उमेदवार आहेत. ट्रम्प यांचा प्रचार देखील जोरात सुरू आहे. मात्र भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा ट्रम्प यांच्या समर्थकाचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहण्यास मिळाले.

अमेरिकन टिव्ही होस्ट आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक टोमी लहरेन यांनी चक्क ट्रम्प हे Owl प्रमाणे बुद्धिमान आहेत. हिंदीमध्ये जसे म्हणतात. उल्लूसारखे बुद्धिमान. मात्र टोमी यांनी ठरल्याप्रमाणे हा प्रचार झाला नाही व त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले.

टोनी लहरेन यांनी भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्या म्हणाल्या की, ट्रम्प 2020 हे संपुर्णपणे अमेरिकेला महान बनविण्यासाठी आहे. कारण राष्ट्रपती ट्रम्प हे घुबडाप्रमाणे बुद्धिमान आहेत. जसे हिंदीमध्ये म्हणता येईल उल्लूसारखे बुद्धिमान.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यातील चूक त्वरित ओळखली. अनेक युजर्सने लिहिले की, ते ट्रम्प यांना उल्लू म्हणत आहेत याचा अर्थ मुर्ख असा होतो. विशेष म्हणजे ते यासाठी आभार मानत आहे. टोमी लाहरेनला उल्लू शब्द भारतात कशासाठी वापरतात हे माहिती नसल्याने सोशल मीडियावरची तिची खिल्ली उडविण्यात आली.