येथे तयार झाले पाण्यावर तरंगणारे जगातील पहिले अ‍ॅपल स्टोर

कोरोना व्हायरसमुळे टेक कंपनी अ‍ॅपलच्या रिटेल नेटवर्कवर भलेही परिणाम झाला असला, तरी कंपनीने आपल्या स्टोर्सची संख्या वाढवण्याचा ठरवलेले दिसत आहे. अ‍ॅपलने आता सिंगापूरमध्ये आपले नवीन रिटेल स्टोर तयार केले असून, हे स्टोर सध्या विशेष चर्चेत आहे.

Image Credited – Bangkok Post

अ‍ॅपलचे हे स्टोर चक्क पाण्यावर तरंगते. पाण्यावर तंरगणारे हे अ‍ॅपलचे पहिलेच स्टोर आहे.अ‍ॅपलचे हे स्टोर एका लग्झरी हॉटेल आणि रिसॉर्टचा भाग आहे. कंपनीचे हे सिंगापूरमधील तिसरे स्टोर आहे. सिंगापूरमधील कंपनीने पहिले स्टोर 2017 साली सुरू केले होते. याशिवाय सिंगापूरमध्येच ट्रांसपोर्टेशन हब, जेथे सर्वात लांब इनडोर झरा आहे तेथे कंपनीचे आणखी एक स्टोर आहे.

Image Credited – AppleInsider

दिवसा हे पाण्यावर तरंगणारे अ‍ॅपलचे नवीन मरीना बे सँड्स स्टोर एखाद्या अंतराळ यानाप्रमाणे दिसते. अ‍ॅपलचे हे 512 वे रिटेल स्टोर आहे. या स्टोरच्या इंटेरियरबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हे स्टोर लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.