भारतीय लष्कराला सीमेवर मिळाले हे घातक क्षेपणास्त्र, क्षणात पाक-चीनची विमाने होणार नेस्तनाबूत

पुर्व लडाख भागातील एलएसीला लागून असलेल्या भागात चीनी हेलिकॉप्टर्सच्या हालचाली वाढल्या आहेत. भारताने चीनच्या कोणत्याही हालचालींना सडेतोड उत्तर देण्यासाठी पुर्ण तयारी केली आहे. एलएसीला लागून असलेल्या उंचीवरील भागात भारताने शोल्डर-फायर्ड एयर डिफेंस मिसाइलने (Troops with Shoulder-Fired air defence system) सुसज्ज असलेल्या जवानांना तैनात केले आहे. हे क्षेपणास्त्र खांद्यावर ठेवून फायर करता येते. हवाई सीमेचे उल्लंघन करणाऱ्या शत्रूच्या हेलिकॉप्टर, फायटर जेट्स किंवा ड्रोन्सला क्षणात उद्धवस्त करू शकते.

रशियाच्या या एअर डिफेंस सिस्टमला भारतीय लष्करासोबतच हवाई दल देखील वापरते. शोल्डर एअर डिफेंस क्षेपणास्त्रांशिवाय भारताने एलएसीजवळ शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रडार तैनात केले आहेत. सोबतच जमिनीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र देखील आहे.

चीनच्या कोणत्याही चलाखीला ठोस उत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे. भारताने मे महिन्यातच एलएसीवर Su-30MKI ला तैनात केले आहे. भारत चीनच्या शिनजियांग आणि तिबेट क्षेत्रातील होटन, गर गुन्सा, काशगर, होपिंग, कोंका जोंग, लिंजी आणि पंगत लष्कर तळांवर लक्ष ठेवून आहे.