बँकेकडून आलेला मेल उघडण्यापुर्वी डोमेन नक्की पहा, एक चूक पडू शकते महागात

कोरोना संकटाच्या काळात सायबर हल्ल्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आर्थिक फसवणूक सायबर हल्ल्यामधील सर्वात मोठे कारण असते. सर्वाधिक ईमेलच्या माध्यमातून लोकांसोबत आर्थिक फसवणूर होत असते. बँकेच्या नावाशी साम्य असलेले मेल येतो व युजर ही बँकेशी संबंधित माहिती असल्याचे समजतात व आपली वैयक्तिक माहिती हॅकर्सला देतात. तज्ञांनुसार कोणत्याही मेलमधील लिंक किंवा अटॅच फाईल उघडण्यापुर्वी विशेष काळजी घ्यावी.

फिशिंग असणारे मेलमध्ये अनेकदा बँकेच्या ग्राहकांना एखाद्या लिंकवर क्लिक किंवा अटॅचमेंट उघडण्यास सांगितले जाते. मात्र जोपर्यंत ही लिंक तुमच्या अधिकृत बँकेकडून आलेली नसल्यास उघडू नये. अनेक बँकेच्या डोमेन नेममध्ये देखील सामन्य असते. हॅकर्स बँकेशी मुळते जुळते डोमेन नेम वापरून ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे कोणताही मेल उघडण्यापुर्वी डोमेन नेम नक्की पाहावे.

हॅकर्स तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यानंतर अगदी हुबेहुब वेबसाईटवर घेऊन जातात. लोक ही बँकेची खरी वेबसाईट असल्याचे समजून आपली माहिती देतात व यामुळे मोठे नुकसान होते. इंडियन कॉम्प्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) 2019 च्या वार्षिक अहवालानुसार संस्थेने सायबर क्राइमच्या एकूण 3 लाख 94 हजार 499 घटनांची नोंद केली. यामध्ये ईमेल फिशिंगची 472 प्रकरणे, व्हायरस अटॅकची 62163, वेबसाइट डिफेसमेंटच्या 24,366 प्रकरणांचा समावेश आहे.

सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारताची सुरक्षा व्यवस्था कुमकुवत मानली जाते. या धोक्यापासून वाचण्यासाठी बँक आणि ग्राहक दोघांनाही जागरुक करण्याची गरज आहे.