‘सरकारकडून जनतेची उघडपणे लूट’, पेट्रोल दरावरून राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर वारंवार निशाणा साधत आहेत. आता राहुल गांधींनी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार जनतेला खुलेआम लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लगातार सहाव्या दिवशी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीविषयी बातमी शेअर करत त्यांनी सरकारवर टीका केली.

पेट्रोल दरावरून केंद्रावर टीका करत राहुल गांधींनी ट्विट केले की, महागडे पेट्रोल आणि वाढत्या किंमतींनी सरकार जनतेची उघडपणे लूट करत आहे.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात मनमोहन सिंग यांच्या विरोधात प्रचारात ‘बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार।’, असे नारे वापरले होते. याच्याशी साम्य असलेले नारे वापरत आता राहुल गांधी मोदी सरकारवर टीका करत आहे.

Loading RSS Feed