हवाई दलाच्या My IAF अ‍ॅपमुळे मिळणार नोकरीपासून पगारापर्यंत सर्व माहिती

भारतीय हवाई दलाने My IAF हे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमध्ये हवाई दलातील करिअर आणि नोकरी संदर्भातील माहिती मिळेल. या अ‍ॅपमध्ये उमेदवारांना अधिकारी आणि एअरमन या दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया, प्रशिक्षण अभ्यासक्रम, पगार व इतर माहिती सहज उपलब्ध होईल. My IAF अ‍ॅपला भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांच्याद्वारे लाँच करण्यात आले. हे अ‍ॅप डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत लाँच करण्यात आलेले आहे. भारतीय सैन्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या अ‍ॅपची माहिती देण्यात आली.

युजर या अ‍ॅपला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. या अ‍ॅपमध्ये युजर्सला भारतीय हवाई दलाचा इतिहास आणि वीरतेबद्दल देखील माहिती मिळेल.

युजर्सला यात हवाई दलाच्या प्रशिक्षण केंद्रांबाबत माहिती मिळेल. सोबतच हवाई दलात जीवन शैली कशी असते, हे समजण्यास मदत होईल. अ‍ॅपद्वारे युजर्स हवाई दलाचा मोटो, इतिहास, चीफ ऑफ एअरस्टाफ, अधिकारी यांच्याबाबत जाणून घेऊ शकतील. हे अ‍ॅप अँड्राईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करते व हे अ‍ॅप पुर्णपणे मोफत आहे.