जर्मनीचा पाकिस्तानला AIP टेक्नोलॉजी देण्यास नकार


नवी दिल्ली – जर्मनीकडे पाणबुड्यांसाठी आवश्यक असलेल्या एअर इंडिपेंडट प्रोप्लशन (AIP) सिस्टिमचा पुरवठा करण्याची विनंती पाकिस्तानने केली होती. जर्मनीच्या चॅन्सलर अँजला मर्केल यांच्या अध्यक्षतेखालील टॉपच्या जर्मनी सुरक्षा समितीने पाकिस्तानची मागणी धूडकावून लावली आहे. पाणबुडी अनेक आठवडे समुद्रात जर्मनीच्या या AIP सिस्टिममुळे पाण्याखाली राहू शकते. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासाला या निर्णयाची माहिती सहा ऑगस्टला अँजला मार्केल यांच्या अध्यक्षतेखालील जर्मन फेडरल सिक्युरिटी काऊन्सिलने कळवली आहे. पाणबुडीची बॅटरी AIP सिस्टिममुळे रिचार्ज करता येते. त्यासाठी पाण्याच्या पुष्ठभागावर येण्याची गरज लागत नाही. पाणबुडी या सिस्टिममुळे दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकते. त्यामुळे AIP सिस्टिमची मागणी पाकिस्तानने केली होती.

आपल्याकडे असलेल्या पाणबुड्यांची ताकत वाढवण्यासाठी पाकिस्तानला त्या अपग्रेड करायच्या आहेत. चीन-पाकिस्तान संयुक्त प्रकल्पातंर्गत युनान क्लास पाणबुड्यांची निर्मिती चीनमध्ये करण्यात आली आहे. पारंपारिक पाणबुडीला दर दुसऱ्यादिवशी समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. त्यामुळे सहजपणे रडारला त्या पाणबुडीचे लोकेशन समजू शकते. इम्रान खान सरकारला टेक्नोलॉजी देण्यास जर्मनीने नकार दिल्यामुळे पाकिस्तानी पाणबुड्यांची युद्ध लढण्याच्या क्षमेतवर परिणाम होणार आहे.