महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येत आहे ‘फोर्स गुरखा’

भारतीय बाजारात ग्राहकांना छोट्या कार्सच्या तुलनेत एसयूव्ही जास्त लोकप्रिय ठरत आहे. एसयूव्ही कार्सची मागणी वाढत आहे. काही दिवसांपुर्वीच महिंद्राने आपली नवीन एसयूव्ही 2020 महिंद्रा थार वरील पडदा हटवला होता. 2 ऑक्टोंबरला ही एसयूव्ही लाँच होणार आहे. महिंद्राच्या नवीन थारला टक्कर देण्यासाठी बाजारात फोर्स मोटर्स आपली एसयूव्ही गुरखा नवीन अवतारात लाँच करणार आहे. कंपनीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये नवीन गुरखा बीएस6 ला सादर केले होते.

Image Credited – Amarujala

नुकतेच फोर्स मोटर्सच्या डीलरशीपने आपल्या फेसबुक पेजवर 2020 गुरखा बीएस6 प्रोडक्शनचा फोटो शेअर करत लवकरच येत आहे, असे लिहिले होते. त्यामुळे कंपनीची ही नवीन एसयूव्ही लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने नवीन गुरखा एसयूव्हीमध्ये हायड्रोलिक स्प्रिंग क्वॉइल सस्पेंशन आणि 17 इंच ट्यूबलेस टायर दिला आहे. हे एखाद्या ट्रकचे टायर असल्यासारखे वाटते.

Image Credited – Amarujala

कंपनीने नवीन गोरखामध्ये चारही बाजूला ऑफ रोड क्लँडिंग दिले आहे. कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, दोन एअरबॅग्स, एबीएस, रिअर पार्किंग सेंसर, पॉवर विंडो डीआरएलसोबत एलईडी हेडलँप फीचर्स मिळेल. यात मॅन्युअल लॉकिंग डिफ्रेंशियलसोबत नवीन चेसिस देखील मिळेल.

Image Credited – Amarujala

फोर्स गोरखाच्या लेटेस्ट फोटोमध्ये जे मॉडेल दिसत आहे, ते ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलेल्या व्हर्जन सारखेच आहेत. ऑटो एक्सपोमध्ये सादर केलेल्या व्हर्जनमध्ये फेंडर-माउंटेड इंडिकेटर्स, सर्कुलर LED डीआरएल, सिंगल स्लॅट ग्रिल, फॉग लाइट्स, स्नोर्कल, फाइव्ह-स्पोक एलॉय व्हिल्ससोबत रूफ-माउंटेड लगेज कॅरियर देण्यात आले आहे.

इंजिनबद्दल सांगायचे तर फोर्स गुरखामध्ये बीएस-6 कम्प्लायंट 2.6 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. जे 89बीएचपी पॉवर देते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय देखील मिळेल. दरम्यान, महिंद्रा नेक्स्ट जनरेशन थारला लवकरच लाँच करत आहे. अशात नवीन गुरखा महिंद्राला टक्कर देऊ शकते.