Rail Yatri वरून लीक झाला ७ लाख प्रवाशांचा डेटा


नवी दिल्ली : रेल्वेच्या माहिती अथवा अन्य चौकशीसाठी आपल्या देशात अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत, त्याचबरोबर अनेक थर्डपार्टी वेबसाईट्स देखील रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी उपलब्ध आहेत. यापैकीच एक असलेल्या Rail Yatri या वेबसाईटवरुन तब्बल ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तब्बल ७ लाख प्रवाशांची माहिती या वेबसाइट्सने चुकून लीक केली. यात डेबिट कार्डची माहिती, यूपीआय डेटा आणि खासगी माहितीचा समावेश आहे. खासगी माहितीमध्ये नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि डेबिट कार्ड क्रमांक आहेत.

यासंदर्भातील नेक्स्ट वेबने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, युजर्सचा डेटा सुरक्षित नसलेल्या सर्व्हरमध्ये रेल यात्री वेबसाइटने ठेवला होता. डेटा लीक झाल्याची माहिती देणाऱ्या सिक्युरिटी फर्मने म्हटले आहे की, या युजर्संची माहिती ज्या सर्व्हरमध्ये होती, तो एन्क्रिप्टेड सुद्धा नव्हता आणि त्यामध्ये पासवर्डही नव्हता. आयपी अॅड्रेसद्वारे सामान्य व्यक्तीसुद्धा युजर्सचा डेटा अॅक्सेस करू शकता होता, असे म्हटले जात आहे.

या डेटा लीकची माहिती सेफ्टी डिटेक्टिव्ह नावाच्या एका सायबर सिक्युरिटी फर्मने दिली आहे. १० ऑगस्टला अनसिक्योर्ड (असुरक्षित) सर्व्हरबद्दल माहिती मिळाली, ज्यात ४३ जीबी डेटा होता, असे रिसर्चर्सने असे म्हटले आहे. रेल्वे यात्रीच्या कथित सर्व्हरचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. ज्यात प्रवाश्यांची माहिती पाहता येऊ शकते. सिक्युरिटी फर्मने १७ ऑगस्ट रोजी या लीकबाबत सीईआरटीला सांगितले. सीईआरटी भारत सरकारचीच एक संस्था आहे. नेक्स्ट वेबच्या रिपोर्टनुसार, या सर्व्हरला कंपनीने नंतर गुप्तपणे बंद केले.

दरम्यान, डेटा लीकचा रिपोर्ट रेल यात्री कंपनीकडून फेटाळून लावण्यात आला असला तरी कंपनी याची चौकशी करत असल्याचेही सांगण्यात आले आहे. ७ लाख ईमेल अॅड्रेस लीक झाल्याचा रिपोर्ट वास्तविक चुकीचा आहे, असे रेल यात्रीच्या वेबसाइटवरील निवेदनात म्हटले आहे. तसेच, रेल यात्रीने म्हटले आहे की, युजर्सचा आर्थिक डेटा लीक झाला नाही. कंपनी युजर्सचा आर्थिक डेटा आणि संवेदनशील माहिती संग्रहित करत नाही. यापैकी काही डेटा केवळ संग्रहित आहे, असे रेल यात्री कंपनीने म्हटले आहे.