वाढदिवसाचे सेलिब्रेशन उसेन बोल्टला पडले महागात; झाला कोरोनाबाधित


सोशल डिस्टेंसिंगचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्ट याने नुकताच ३४ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर बोल्टला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याचे मित्र उपस्थित होते आणि एकत्र जल्लोष करत होती. सध्या बोल्ट आयसोलेशनमध्ये आहे.

याबाबत माहिती देताना जमैका रेडिओ स्टेशन ‘नेशनवाइड ९० एफएम’ ने सांगितले की बोल्टला या आजाराची लागण झाली असून तो आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, 34 वर्षीय बोल्टची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि रविवारी त्याला या आजाराची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

2017 लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर स्पर्धेत तिसरे स्थान मिळवल्यानंतर बोल्टने आपल्या कारकीर्दीला निरोप दिला. स्प्रिंटींगमधून निवृत्त झाल्यानंतर बोल्टने व्यावसायिक फुटबॉलमध्ये आपला हात आजमावला, जिथे त्याने ऑक्टोबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया-ए लीग टीम सेंट्रल कोस्टल मेरिनर्सबरोबर सराव केला.