बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत अभिनेता सुशात सिंहला मृत्यु पश्चात न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न करत आहे. पण कंगनाच्या या मोहिमेतील आता सुशांतच्या फॅमिली वकीलांनी जणू हवाच काढून घेतली आहे. कंगनावर असा काही सुशांतचे फॅमिली वकील विकास सिंग यांनी ‘वार’ केला की, ट्विटरवर #Boycott_Kangana हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला आहे.
सर्वांवर आगपाखड करणाऱ्या कंगनावर भडकले नेटकरी; ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana
अलीकडेच कंगना राणावतवर सुशांतचे फॅमिली वकील विकास सिंह यांनी निशाणा साधला. कंगना ना सुशांतची प्रतिनिधी आहे, ना मित्र, इंडस्ट्रीतील समस्या ती केवळ समोर आणत आहे. सुशांतला सुद्धा नेपोटिजमचा फटका बसला असेल, असे देखील होऊ शकते. पण सध्या जे काही कंगना करत आहे, ते सुशांतसाठी नाही तर स्वत:साठी करत असल्याचे विकास सिंह यांनी म्हटले आहे.
सुशांतच्या फॅमिली वकीलांच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर #Boycott_Kangana हा हॅगटॅग अचानक ट्रेंड होऊ लागला. कंगना राणावतवर बहिष्कार घालण्याची अनेक नेटकऱ्यांनी मागणी केली. दुस-याच्या मृत्यूचे भांडवल करून स्वत:चा अजेंडा चालवल्याबद्दल तुला लाज वाटायला हवी, अशी संधीसाधू मी बघितली नसल्याचे एका युजरने म्हटले आहे.