तुमच्या ह्रदयाची काळजी घेतील हे 5 फोन

कोरोना व्हायरस महामारीच्या काळात लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक सतर्क झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात अशा डिव्हाईसची विक्री देखील वाढली आहे, जे आरोग्यासंबंधी माहिती देतात. नुकतेच लावा मोबाईल्सने एक फीचर फोन सादर केला असून, ज्यात हार्ट रेट सेंसर देण्यात आलेला आहे. लावा व्यतिरिक्त अनेक कंपन्यांनी असे फीचर दिलेले आहे. या फोन्सविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amaruajala

लावा प्लस –

काही दिवसांपुर्वीच लावा प्लस हा फोन लाँच झाला आहे. या फोनमध्ये हार्ट रेट सेंसर देण्यात आलेले असून, वरिष्ठ नागरिकांसाठी हे फीचर फायदेशीर आहे. या फोनमध्ये ब्लड प्रेशरची देखील माहिती मिळते. फोनची किंमत 1949 रुपये आहे. हे फीचर्स असणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. फूल चार्ज केल्यावर फोनची बॅटरी 6 दिवस टिकते, असा दावा देखील कंपनीने केला आहे.

Image Credited – Amaruajala

सॅमसंग गॅलेक्सी एस8/एस8 प्लस –

सॅमसंगने या स्मार्टफोनला 2017 मध्ये सादर केले होते. या फोनच्या कॅमेरा मॉड्यूलजवळ हार्टरेट सेंसर दिलेले आहे. या सेंसरवर बोट ठेवून युजर सॅमसंग हेल्थ अ‍ॅपच्याद्वारे हार्ट रेटची माहिती मिळवू शकतात. फोनची किंमत 53,990 रुपये आहे.

Image Credited – Amaruajala

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 –

सॅमसंगने गॅलेक्सी नोट8 मध्ये देखील हे फीचर दिले आहे. कंपनीने बॅक साइडला हार्ट रेट सेंसर दिले आहे. कंपनीने पहिल्यांदा या फोनमध्येच ड्युअल कॅमेरा सेटअप दिला होता. या फोनची किंमत 45,770 रुपये आहे.

Image Credited – Amaruajala

सॅमसंग गॅलेक्सी एस 9/एस 9 प्लस –

सॅमसंगने गॅलेक्सी एस9/एस प्लस मध्ये हर्ट रेट सेंसर फीचर दिले असून, या फोनची किंमत 31,606 रुपये आहे.

Image Credited – Amaruajala

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 –

सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट 9 मध्ये देखील हे फीचर देण्यात आले असून, यात नॉटिफिकेशन व्यतिरिक्त आयरिस स्कॅनर देण्यात आलेले आहे. याशिवाय ब्लूटूथने कनेक्ट होणारा एस-पेन फीचर देखील मिळेल. फोनची किंमत 73,600 रुपये आहे. दरम्यान, तुम्हाला जर हे फीचर असलेले फोन खरेदी करायचे नसल्यास तुम्ही स्मार्ट बँड, स्मार्ट वॉच देखील खरेदी करू शकता.