स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने काही दिवसांपुर्वीच गॅलेक्सी एम31एस आणि गॅलेक्सी एम01 स्मार्टफोन्स लाँच केले होते. आता कंपनी लवकरच गॅलेक्सी एम51 स्मार्टफोनला लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लाँच होण्याची शक्यता असून, लीक झालेल्या माहितीनुसार यात 7000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 730डी चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
लवकरच होणार लाँच 7000mAh ची दमदार बॅटरी असणारा ‘सॅमसंग गॅलेक्सी एम51’
कंपनीने गॅलेक्सी एम30एस मध्ये 6000एमएएच बॅटरी दिली होती. त्यानंतर आता गॅलेक्सी एम51 मध्ये देखील 7000एमएएच बॅटरी मिळणार आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सल असेल. दुसऱ्या मिड रेंज फोनप्रमाणेच यात देखील एमोलेड डिस्प्ले असेल. स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फूल एचडी+ रिझॉल्यूशन स्क्रीन मिळेल.
लीक झालेल्या रिपोर्टनुसार फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट , 8 जीबी रॅम आणि अँड्राईड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल. याशिवाय इतर फीचरमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, एनएफसी, ब्लूटूथ 5.0 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळण्याची शक्यता आहे. 7000 एमएएच बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
नुकतेच मॉडेल नंबर SMM515F असणाऱ्या अपकमिंग स्मार्टफोनला सॅमसंग रशियाच्या अधिकृत सपोर्ट पेजवर पाहण्यात आले आहे. यावरून संकेत मिळतात की कंपनी लवकरच हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे.