दावा; जॉब पोर्टलवर 40 दिवसात 69 लाख जणांची नोंदणी, केवळ 7700 लोकांना मिळाला रोजगार

जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींनी सरकारी रोजगार पोर्टल लाँच केले होते. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर अवघ्या 40 दिवसांमध्ये यावर तब्बल 69 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यानंतर, रोजगार मात्र तुरळक जणांना मिळाला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, 14 ते 21 ऑगस्ट या एका आठवड्यात रोजगार पोर्टलवर 7 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. रिपोर्टनुसार 7 लाखांमधील केवळ 691 लोकांना रोजगार मिळाला आहे. हा रिपोर्ट कौशल्य विकास मंत्रालयाच्या आकड्यांवर आधारित आहे. आकड्यांवरून स्पष्ट होते की 3.7 लाख उमेदवारांपैकी केवळ 2 टक्के लोकांना रोजगार मिळालेला आहे.

रिपोर्टमध्ये समोर आले की, 69 लाख प्रवासी कामगारांनी देखील रोजगारासाठी अर्ज केला. यातील जवळपास दीड लाख लोकांना रोजगाराचा प्रस्ताव दिला. त्यातील केवळ 7700 कामगार कामावर रुजू झाले. या रोजगार पोर्टलला लोकांना स्किल ट्रेनिंग देण्यासाठी सुरू केले होते. पोर्टलवर नोंदणी केलेले सर्व लोक प्रवासी कामगार नाहीत. पोर्टलवर टेलर, इलेक्ट्रिशियन, फील्ड टेक्निशियन, शिवणकामाचे यंत्र ऑपरेटर व फीटर्स,कुरिअर वितरण अधिकारी, नर्स, खाते अधिकारी, मॅन्युअल क्लिनर आणि सेल्स असोसिएट्सची जास्त मागणी आहे.

पोर्टलद्वारे लक्षात येते की कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, तेलंगाना आणि तामिळनाडूमध्ये कामगारांची मोठी कमतरता आहे. लॉकडाऊनमध्ये या राज्यातून अनेक कामगार उत्तर प्रदेश, बिहारला परतले आहेत. पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या एका आठवड्यात 80 टक्क्यांनी वाढली आहे. 14 ते 21 ऑगस्ट दरम्यान ही संख्या 2.97 लाख लोकांवरून 3.78 लाख लोकांवर गेली. दुसरीकडे, रोजगार मिळालेल्या लोकांची संख्या केवळ 9.87 टक्के वाढली. आधी 7009 लोकांना रोजगार मिळाला, नंतर या आठवड्यात हा आकडा वाढून 7700 झाला. पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या 11.98 टक्क्यांनी वाढली आहे. ही संख्या 61.67 टक्क्यांवरून वाढून 69 लाखांवर गेली आहे.