‘ये ‘थार’ मुझे दे दे ठाकूर…’, आनंद महिंद्रांना आवडले युजरने शेअर केलेले हे भन्नाट मीम

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपने आपल्या न्यू जनरेशन महिंद्रा थारला स्वातंत्र्य दिनाला सादर केले होते. लाँचपुर्वीच महिंद्रा थारची लोकप्रियता वाढली आहे. सोशल मीडियावर युजर्स महिंद्रा थार आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रांशी संबंधित अनेक क्रिएटिव्ह मीम्स देखील शेअर करत आहेत.

आनंद महिंद्रांना थारबाबत युजर्सने शेअर केलेले वन लाइनर्स खूपच आवडली. शोले चित्रपटातील लोकप्रिय डॉयलॉगचा वापर करत एका युजरने ‘ये थार मुझे दे दे ठाकुर!’, अशी प्रतिक्रिया दिली होती.

आनंद महिंद्रांनी यांना ही प्रतिक्रिया एवढी आवडली की त्यांनी युजर्सला या वाक्याचे व्हिज्युल मिम्स बनवून देण्याची विनंती केली. यानंतर युजर्सनी एकापाठोपाठ एक असे भन्नाट मिम्स शेअर केले. यात एका मीममध्ये आनंद महिंद्रांचा चेहरा चक्क ठाकूरच्या जागी लावण्यात आला होता. आनंद महिंद्रांना देखील हे मीम खूपच आवडले. त्यांनी लिहिले की, हे माझ्याकडे कायम राहील आणि गब्बर मी माझे हात परत घेण्यासाठी येत आहे.

Image Credited – Amarujala

दरम्यान, महिंद्रा थारची 2 ऑक्टोबर 2020 पासून भारतात विक्री सुरू होईल. वर्ष 2010 मध्ये सर्वात प्रथम थारला लाँच करण्यात आले होते. नवीन थारमध्ये पहिल्यांदा पेट्रोल इंजिनसह अनेक नवीन फीचर देण्यात आलेले आहेत. या 4X6 एसयूव्हीची किंमत 10 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. न्यू जनरेशन थार भारतीय बाजारात दोन इंजिनमध्ये उपलब्ध असेल. यात बीएस6 कंप्लाएंट 2.2-लीटरचे mHawk डिझेल इंजिन आणि 2.0-लीटरचे टर्बोचार्ज्ड mStallion पेट्रोल इंजिन मिळेल.