इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड, 1 सेंकदात नेटफ्लिक्सवरील सर्वकाही डाउनलोड होणार

आजकाल सर्व कामे ही इंटरनेटच्या मदतीने होतात. इंटरनेट जेवढे फास्ट असेल, कामे तेवढीच जलद होतात. भारतात सर्वसाधारणपणे एमबीपीएसमध्ये इंटरनेट स्पीड मिळतो. मात्र लंडनमधील वैज्ञानिकांना एमबीपीएस, जीबीपीएस नाही तर चक्क टीबीपीएस स्पीड मिळाला आहे.

यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला असून, या संशोधकांना 178Tbps (178,000Gbps) इंटरनेट स्पीड मिळाला असून, हा जगातील सर्वात वेगवान इंटरनेटचा रेकॉर्ड आहे. याआधी जपानमध्ये 172टीबीपीएस इंटरनेट स्पीड वापरण्यात आला होता.

178 टीबीपीएस स्पीडचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असल्यास, असे समजा की तुम्ही अवघ्या सेकंदात नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर काँटेट डाउनलोड करू शकता. यूनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रॉनिक अँड एल्क्ट्रिकल इंजिनिअरने सांगितले की, स्टेट ऑफ द आर्ट क्लाउड डेटा सेंटर इंटरकनेक्शन्स सध्या 35 टीबीपीएसपर्यंत ट्रांसपोर्ट करू शकतात. आम्ही नवीन टेक्नोलॉजीसोबत काम करत आहोत. ज्याला सध्याच्या इंफ्रास्ट्रक्चरचा वापर करून अधिक चांगले बनवता येईल.

सर्वसाधारणपणे नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चरमध्ये: 4.5THz बँडविथचा चा वापर केला जातो. जरी 9THz पर्यंत बँडविथ उपलब्ध असले तरी ते निवडक आहे. संशोधकांनी 178 टीबीपीएस स्पीड मिळवण्यासाठी 16.8 THz चा वापर केला आहे. 178 टीबीपीएस गती स्पीड मिळवण्यासाठी संशोधकांच्या टीमने ऑप्टिकल फायबरमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेवलेंथच्या जागी वाइडर रेंजचा वापर केला.