जिओने लाँच केला क्रिकेट धन धना धन प्लॅन, ही सेवा मिळणार मोफत

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आयपीएलच्या निमित्ताने क्रिकेट धन धना धन प्लॅन्स लाँच केला आहे . या प्लॅन अंतर्गत सर्व क्रिकेट सामने लाईव्ह पाहता येणार आहेत. या प्लॅन्सला खास क्रिकेट चाहत्यांसाठी लाँच करण्यात आले असून, यात युजर्सला डेटा देखील मिळणार आहे.

जिओने 499 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यात 1 वर्षांसाठी मोफत डिज्नी+ हॉटस्टारचे स्बस्क्रिप्शन देण्यात आले आहे. सोबतच 56 दिवसांच्या कालावधीसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कंपनीने 777 रुपयांचा आणखी एक प्लॅन लाँच केला आहे. यात देखील डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल. या प्लॅनचा कालावधी 84 दिवसांचा असून, यात एकूण 131 जीबी मिळेल. सोबतच अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचा एक्सेस मिळेल.

या दोन प्लॅन व्यतिरिक्त जिओचे आणखी काही स्वस्तातले प्लॅन्स क्रिकेटसाठी आहेत. यात 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 महिन्यासाठी 90 जीबी डेटा मिळेल. 2599 रुपयांचा एक वर्षाचा प्लॅन आहे. यात 740 जीबी डेटा मिळेल. तसेच, 612 रुपयांच्या प्लॅनमध्ये 72 जीबी डेटा+6000 मिनिट नॉन जिओ कॉलिंग मिळेल. 180 दिवसांचा कालावधी असलेला 1004 रुपयांचा प्लॅन देखील युजर्ससाठी जिओने आणलेला आहे.