कोरोनाची भिती घालवण्यासाठी जपानमध्ये लोक करत आहेत हे काम

कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. या महामारीने अनेकांच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. लोकांच्या मनात या व्हायरसबाबत भिती आहे. हीच भिती घालवण्यासाठी जपानमधील एका ग्रुपने वेगळी शक्कल लढवली आहे. एक जपानी ग्रुप लोकांच्या मनातील या आजाराची भिती घालवण्यासाठी त्यांना शवपेटीत झोपवतो व त्यांच्या आजुबाजूला धारधार शस्त्र असलेले झाँबी फिरत असतात.

टोकियामध्ये लोक खिडकी असलेल्या एका पेटीत झोपून कोरोनाची भिती घालवू शकतात. या दरम्यान व्यक्तीला भितीदायक कथा सांगितल्या जातील. व्यक्ती शेवपेटीत झोपून समोरील व्यक्तीला अभिनय करता देखील पाहू शकेल. शवपेटीतील व्यक्तीला घाबरवले जाईल, पाण्याची फवारणी केली जाईल.

प्रोडक्शन कंपनी कोवागसेटाईचे केंटा इवाना म्हणाले की, या महामारीमुळे अनेकजण तणावाचा सामना करत आहे. आम्हाला आशा आहे की स्क्वेअर स्क्वॉड नावाच्या या 15 मिनिटांच्या शो मुळे लोकांना किंचळण्याची संधी मिळेल. ज्यामुळे त्यांचा तणाव कमी होईल. अनेकजण या शो मध्ये गेल्यानंतर त्यांना चांगले वाटत आहे. जवळपास 8 ते 10 डॉलर्स या शोसाठी खर्च करावे लागतात.