रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. काजळ पुरा या भागात सांयकाळी 7 वाजता ही घटना घडली असून, ढिगाऱ्याखाली 100-150 लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, मदत कार्य सुरू आहे. पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, 200 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
इमारतीचा पाया खचल्यामुळे एखाद्या पत्त्याप्रमाणे ही इमारत तशीच खाली कोसळली. ही इमारत जवळपास 10 वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. या 5 मजली इमारतीमध्ये 50 फ्लॅट होते. जेसीबी आणि स्थानिक लोकांच्या मदतीने फायर ब्रिगेडची टीम बचाव कार्य करत आहे. आतापर्यंत 15 जखमी लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेले आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.