पत्नीशी निगडीत प्रश्नावर भडकले हे राष्ट्रपती, पत्रकाराला म्हणाले, तुझे मुस्काट फोडायचे आहे

ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सनारो यांनी एका पत्रकाराला सर्वांसमोर थेट तोंडावर ठोसे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पत्रकाराने बोल्सनारो यांनी एका योजनेमधील भ्रष्टाचारात त्यांच्या पत्नीच्या संबंधांबाबत प्रश्न विचारला होता.

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना बोल्सोनारो म्हणाले की, मला तुझे मुस्काट फोडायचे आहे. राष्ट्रपतींनी अशा प्रकारे सर्वांसमोर थेट धमकी दिल्याने तेथे असलेल्या इतर पत्रकारांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. बोल्सनारो यांनी या निदर्शनाकडे दुर्लक्ष करत ते तेथून निघून गेले.

ओ ग्लोबोच्या पत्रकाराने एका मॅग्झिनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाच्या आधारावर घोटाळ्याबाबत प्रश्न विचारला होता. रिपोर्टमध्ये प्रथम महिला मिशेल बोल्सनारो आणि एका निवृत्त पोलीस अधिकारी फॅब्रिकियो क्यूरीज यांच्याबाबत प्रश्न विचारला होता. फॅब्रिकियो हे बोल्सोनारो यांचे मित्र आहेत.

सार्वजनिकरित्या पत्रकाराला धमकी दिल्यानंतर ओ ग्लोबो संस्थेने म्हटले की, अशा प्रकारची धमकी दिल्याने बोल्सनारो यांना जन प्रतिनिधिची काय कर्तव्य असतात हे कदाचित माहिती नाही.