… आणि या ग्राहकाच्या खात्यात दिसले तब्बल 18000 कोटी रुपये

नुकतेच अमेरिकेत सिटीग्रुप इंकने चुकीने काही सावकारांच्या खात्यात तब्बल 900 मिलियन डॉलर जमा केल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. आता बँक ऑफ अमेरिकेच्या एका खातेदारासोबत अशीच घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स येथील खातेदाराने आपल्या खात्यातील रक्कम तपासल्यावर त्यांना तब्बल 2.45 बिलियन डॉलर्स (जवळपास 18170 कोटी रुपये) असल्याचे आढळले. मात्र पैसे दिसत असले तरी खात्यात हे पैसे नव्हते.

या चुकीबाबत बँक ऑफ अमेरिकेचे प्रवक्ते बिल हलदिन यांनी सांगितले की, हा केवळ एक डिस्प्ले एरॉर होता, जास्त काही नाही. ही चूक सुधारण्यात आली आहे.

मनोचिकित्सक असलेले ब्लैस अग्युर्र यांनी सांगितले की, मला वाटले ही चूक बँकेच्या लक्षात येईल व ते सुधारतील. मात्र चूक बँकेच्या लक्षात न आल्याने ते स्वतः बँकेत गेले व अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर ही रक्कम दिसत असल्याची माहिती दिली. अखेर बँकेने ब्लैस यांच्या मेरिल लिंच खात्याची चूक दुरुस्त केली.

दुसरीकडे सिटीग्रुपसाठी मात्र रक्कम परत मिळवणे सोपे नव्हते. काही लोकांनी चुकीने आलेल्या पैस परत केले. मात्र काही जणांनी पैसे देण्यास नकार दिला. हे प्रकरण न्यायालयात देखील गेले.

Loading RSS Feed