‘अल्पसंख्याकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका’, माजी अधिकाऱ्यांचे मार्क झुकेरबर्गला पत्र

देशात फेसबुकवरून राजकीय वाद सुरू आहे. आता 54 माजी अधिकाऱ्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गला पत्र लिहिले असून, यात फेसबुकच्या हेट स्पीच पॉलिसीचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. पत्रात लिहिले आहे की मार्क झुकेरबर्ग यांनी सुनिश्चित करावे की कंपनीच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड अंखी दास या चौकशीवर प्रभाव टाकण्याच्या स्थितीमध्ये तर नाही.

माजी सरकारी अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले की, फेसबुकच्या भारतातील काही निर्णयांमुळे देशातील लोकांच्या मुलभूत अधिकारांना धोका पोहचवला. आमचे याकडे लक्ष 14 ऑगस्टला वॉल स्ट्रिट जनरलमध्ये छापून आलेल्या एका लेखानंतर गेले. आम्ही हे पत्र या आशेने लिहित आहोत की यानंतर भारतात लागू होणारी फेसबुकची हेट स्पीच पॉलिसीला गंभीरतेने घेतले जाईल आणि भारतातील अल्पसंख्यांकांना बदनाम करणारे आणि धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या आधाराला कमकुवत करणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये.

दरम्यान, फेसबुक वादावर सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक इंडियाचे मॅनेजिंग एडिटर आणि वॉइस प्रेसिडेंड अजित मोहन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, फेसबुक नेहमीच एक खुला आणि पारदर्शक मंच आहे. फेसबुक कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. या मंचावर लोकांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. काही दिवसांमध्ये आमच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. खासकरून हेट स्पीचबाबत आमच्या धोरणांबाबत अनेक आरोप करण्यात आले. आमच्या प्लॅटफॉर्मवर हेट स्पीचला कोणतेही स्थान नाही. सामग्रीबाबत आमचा एक निष्पक्ष दृष्टीकोण आहे व हे आमच्या कम्युनिटी स्टँडर्डद्वारे संचालित होते.