व्हिडीओ : युट्यूबरने 10 हजार लीटर ‘कोका-कोला’द्वारे केला भन्नाट कारनामा

सोशल मीडियावर दररोज हटके कारनामे असलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक एक कोका-कोलासोबत केलेल्या प्रयोगाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. कदाचित तुम्ही देखील असा प्रयोग कधीतरी केला असावा, मात्र या युट्यूबरने हा प्रयोग प्रंचड मोठ्या स्तरावर केला आहे.

या प्रयोगासाठी युट्यूबरने तब्बल 10 हजार लीटर कोका-कोलाचा वापर केला आहे. त्याने हजारो लीटर कोका-कोला एका मोठ्या बाटलीच्या आकाराच्या भांड्यात टाकला व त्यात सोडा मिसळला. यानंतर जो स्फोट झाला त्याने कोल्ड ड्रिंकचा एक उंच फवारा पाहण्यास मिळेल.

या गजब प्रयोगाचा व्हिडीओ Mamix? नावाच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केले असून, या व्हिडीओला आतापर्यंत 62 लाख लोकांनी बघितले आहे. तर 15 लाख लोकांनी लाईक केले आहे.

युट्यूबरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हा एक ऐतिहासिक व्हिडीओ आहे. याची सुरुवात 4 वर्षांपुर्वीच झाली होती. 4 वर्षांपासून हा प्रयोग करण्याची कल्पना युट्यूबरच्या डोक्यात होती. त्याने पुढे लिहिले की, कदाचित तुम्हाला हा वेडेपणा आणि बेकार वाटेल. मात्र माझ्यासाठी हे सर्व महत्त्वे ठरते. माझे संपुर्ण करिअरच यासाठी आहे. मी हे दृष्य पाहून खूप आनंदी आहे.