डोनाल्ड ट्रम्प यांना स्टॉर्मी डॅनियल्सला भरपाई म्हणून द्यावे लागणार ऐवढे पैसे


अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होत आहे. एकीकडे त्यांच्या बहिणीनेच त्यांचे पितळ उघडे पाडल्यानंतर आता ट्रम्प यांना एका पॉर्नस्टारला नुकसान भरपाई म्हणून तब्बल 33 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. हा आदेश अमेरिकेतील एका न्यायालयाने हा आदेश दिला आहे. आपले डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनैतिक संबध असल्याचा दावा स्टॉर्मी डॅनियल्स नावाच्या या पॉर्नस्टारने केला होता. पण तिचा तो दावा ट्रम्प यांनी फेटाळून लावला होता.

यासंदर्भात सीएनएन या वृत्तवाहिनीने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या विरोधात 41 वर्षीय स्टॉर्मी डॅनियल्सने खटला दाखल केला होता. पण तिचा खटला नंतर रद्द झाला. आता न्यायालयाने खटल्यादरम्यान डॅनियल्सचे जे पैसे खर्च झाले असतील त्याची भरपाई ट्रम्प यांना करावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ट्रम्प यांना 33 लाख रुपये संबंधित पॉर्नस्टारला देण्याचा आदेश कॅलिफोर्नियातील न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाची माहिती डॅनियल्स यांच्या वकिलाने दिली. स्टॉर्मी डॅनियल्सने या निर्णयानंतर ट्विट करत म्हटले आहे, की हो, एक आणखी विजय! ट्रम्प यांच्या विरोधात खटला दाखल केल्यानंतर स्टॉर्मी डॅनियल्सने एक पुस्तकही लिहिले होते. यात तिने ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या संबंधांचाही उघडपणे उल्लेख केला होता. हे पुस्तक प्रचंड चर्चेत आले होते.

डॅनियल्सचे असे म्हणणे होते, की ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित अफेअरनतंर तिला गप्प राहण्यासाठी पैसेही देण्यात आले होते. एक करारही यासाठी करण्यात आला होता. तिला जवळपास 97 लाख रुपये ट्रम्प यांच्या वकिलामार्फत देण्यात आले होते. त्याचबरोबर डॅनियल्सने दावा केला होता, की ट्रम्प यांच्याशी 2006 मध्ये तिचे अफेअर होते. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 2006 मध्ये कॅलिफोर्निया आणि नेवादादरम्यान असलेल्या लेक टोहोय हॉटेलमध्ये तिची ओळख डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झाली. तेव्हा ट्रम्प एक व्यावसायिक होते, असा तिने दावा केला होता.

डॅनियल्सने 2011मध्ये ‘इनटच’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की तिला ट्रम्प यांनी डिनरचे आमंत्रण दिले होते. यासाठी ती ट्रम्प यांना त्यांच्या हॉटेलच्या खोलीत भेटण्यासाठी गेली होती. तिने म्हटले होते, की ट्रम्प बिछान्यावर पाय पसरून बसले होते आणि कदाचित ते टीव्ही पाहत होते. ते पायजम्यावर होते. डॅनियल्सने असा देखील दावा केला आहे, की तिने हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्यासोबत सेक्स केला. पण तिचा हा दावा ट्रम्प यांनी सातत्याने फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर ट्रम्प म्हणाले होते, की ते त्यांच्या टेलिव्हिजन शो ‘द अॅपरेन्टिस’मध्ये आपल्याला संधी देऊ शकतात, असेही डॅनियल्सने म्हटले आहे.