या योजनेत पती-पत्नीचे खाते असल्यास मिळेल दुप्पट फायदा, कमवू शकता हजारो रुपये

लोक नोकरीसोबतच कमाईचे आणखी काही साधन शोधत असतात. कारण केवळ नोकरीच्या पगारात बचत करणे अवघड होते. आज पोस्ट ऑफिसच्या अशाच एका खास योजनेबाबत जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही भरपूर कमाई करू शकता. पती-पत्नीने या योजनेत खाते उघडल्यास दुप्पट फायदा होईल. ही पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (एमआयएस) असून, याद्वारे महिन्याला कमाई करू शकता.

एमआयएसमध्ये सिंगल व ज्वाइंट खाते देखील उघडता येते. व्यक्तिगत खाते उघडताना तुम्ही किमान 1000 रुपये आणि कमाल 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. ज्वाइंट खात्यात कमाल गुंतवणूक 9 लाखांपर्यंत करता येते. ही योजना निवृत्त कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी फायद्याची आहे. या योजनेंतर्गंत सध्या वर्षाला 6.6 टक्के दराने व्याज मिळत आहे.

वर्षाला कमवू शकता 59,400 रुपये –

तुम्ही जर या योजनेत ज्वाइंट खाते उघडल्यास तुम्हाला यातून दुप्पट फायदा होईल. समजा, पती-पत्नीने ज्वाइंट खात्यांतर्गत या योजनेत 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. 9 लाखांच्या जमा रक्कमेवर 6.6 टक्क दराने वर्षाला 59,400 रुपये परतावा मिळेल. या रक्कमेला वर्षाच्या 12 महिन्यात विभागल्यास महिन्याला जवळपास 4950 रुपये मिळतील. तुमची मूळ रक्कम देखील कायम राहील. तुम्ही या योजनेला 5 वर्षांनंतर आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.

योजनेचे फायदे –

या योजनेची खास गोष्ट म्हणजे 2 किंवा 3 लोक मिळून एकत्र ज्वाइंट खाते उघडू शकतात. या खात्यातून मिळणाऱ्या रक्कमेला प्रत्येक व्यक्तीला समांतर वाटले जाईल. ज्वाइंट खात्याला कधीही सिंगल खात्यात बदलता येऊ शकते. सिंगल खाते देखील ज्वाइंट अकाउंटमध्ये कधीही बदलण्याची सुविधा मिळते.