डब्ल्यूएचओने सांगितले जगातून कधी नष्ट होणार कोरोना ?

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या आजारावरील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातून कोरोना पुर्णपणे नष्ट होण्यासाठी दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी लागेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस ग्रेब्रेसस म्हणाले की, आम्हाला आशा आहे की दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये कोरोना महामारीन जगातून नाहीशी होईल. 1918 मध्ये परसलेल्या स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी कालावधीत कोरोना नष्ट व्हायरला हवा. त्या काळातील तुलनेत आज सर्व देश वेगाने पुढे जात आहेत व याचमुळे कोरोना देखील वेगाने पसरला. मात्र यासोबतच त्याकाळातील तुलनेत आपण टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात देखील पुढे आहोत व हे आपल्यासाठी फायद्याचे आहे.

ते म्हणाले की, संसाधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून आणि आपल्याकडे लस असावी अशी आशा करू. यामुळे मला वाटते की आपण कोरोना व्हायरसला 1918 मध्ये पसरलेल्या महामारीच्या तुलनेत कमी वेळेत रोखू.