यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी मागितला सल्ला, आयपीएस अधिकाऱ्याने दिले भन्नाट उत्तर

दरवर्षी हजारो विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहून यूपीएससीची परीक्षा देत असतात. काहींना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते, तर काहींना भरपूर मेहनत करत असतात. विद्यार्थी परीक्षा पास करण्यासाठी सोपी पद्धत शोधत असतात. अशाच एका अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा पास होण्यासाठी थेट आयपीएस अधिकाऱ्याकडे सल्ला मागितला. आयपीएस अधिकाऱ्याने या यूपीएससी एस्पिरेंटला दिलेले भन्नाट उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विटर युजर @nanking122 ने आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांना टॅग करत लिहिले की, सर, यूपीएससीची तयारी करत आहे. कृपया मला एक सल्ला द्या.

या युजरला सल्ला देताना अरुण बोथरा यांनी लिहिले की, सर्वात आधी तुझा मोबाईल नोकिया 5310 सोबत बदलून टाक. विशेष म्हणजे या युजरने पुन्हा ट्विटला उत्तर देत लिहिले की, ठीक आहे सर, मी यूपीएससी परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला उत्तर दिल्ला. सल्ला देण्यासाठी धन्यावाद.

अरुण बोथरा यांनी दिलेला सल्ला अनेकांना आवडला. काही युजर्सने लिहिले की स्मार्टफोनने आपले आयुष्य सोपे बनवले आहे. मात्र सोबतच यामुळे अभ्यासावर, कामावर देखील परिणाम होतो.