जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेतील काही लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. यातच आता अमेरिकेच्या एका कंपनीने मलम तयार केल्याचा दावा केला असून, हा मलम लावल्याने कोरोना संक्रमण समाप्त होईल. या मलम अमेरिकेच्या एफडीएने मंजूरी दिली आहे.
नाकावर मलम लावून कोरोनापासून होईल बचाव, अमेरिकेच्या कंपनीचा दावा
यासंबंधीत एका वैज्ञानिकाने सांगितले की, नॉन प्रिस्क्रिप्शन ओव्हर द काउंटर (ओटीसी) मलमने कोरोना व्हायरससह अन्य व्हायरसच्या संसर्गपासून बचाव, उपचार आणि व्हायरस नष्ट करण्याची क्षमता सिद्ध केली आहे.
कंपनीने सांगितले की, लॅबमधून प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार टी3एक्स उपचारानंतर संसर्ग पसरवणारा कोणताही व्हायरस आढळला नाही. अॅडवास्ड पेनिट्रेशन टेक्नोलॉजीचे संस्थापक डॉ. ब्रायन ह्यूबर म्हणाले की, आम्हाला आशा आहे की हा एक महत्त्वपुर्ण शोध ठरले. यामुळे नाकाद्वारे कोरोना व्हायरस आत जाण्याची शक्यता कमी होईल.