बीएसएफ जवानांची मोठी कारवाई, भारत-पाक सीमेवर 5 घुसखोरांना केले ठार

पंजाबमध्ये बीएसएफच्या जवानांनी मोठी कारवाई केली असून, येथील तरन तारनमधील खेमकरन येथे 5 घुसखोरांना ठार करण्यात करण्यात आले. बीएसएफच्या 103 बटालियानच्या जवानांना काही संशयित लोक सीमेजवळ दिसली. या घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला. याला प्रत्युतर देत बीएसएफच्या कारवाईत 5 जण मारले गेले.

हा भाग पाकिस्तान सीमेच्या जवळ आहे. पाकिस्तानच्या बाजूने भिखीविंड सब-डिव्हिजनच्या गावाजवळून घुसखोरी करण्याची प्रयत्न करत होते. घुसखोरांपैकी एकाकडे असॉल्ट रायफल आढळली आहे. अनेकदा सीमेपलिकडून दहशतवाद्यांना भारतात पाठवले जाते. सैन्याच्या तत्परतेमुळे प्रत्येक वेळी दहशतवाद्यांचा कट फसला आहे. सध्या तेथे बीएसएफचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

मागील काही महिन्यात जम्मू-काश्मिरमध्ये देखील सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी केला आहे.