इंदोरचा प्रसिद्ध पोटली गणेश


मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये जुनी इंदोर भागात शनी मंदिराजवळ सुमारे ७५० वर्षे जुने एक गणेश मंदिर असून याला पोटली गणेश असे म्हणतात. देशातील ही गजाननाची एकमेव अशी मूर्ती आहे, ज्यात गणेशाच्या हातात एक पोतडी किंवा बटवा आहे. यालाच हिंदीमध्ये पोटली असा शब्द आहे. जो या गणपतीची मनोभावे पूजा करतो त्याच्या घरात सुखसमृद्धी नांदते असा विश्वास आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी आणि दिवाळीला या मंदिरात खूप गर्दी होते.


या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ज्याचा विवाह काही कारणांनी जमत नाही त्यांना या गणेशाला वाहिलेले हळकुंड प्रसाद म्हणून दिले जाते. हे हळकुंड घरी नेऊन पिवळ्या कपड्यात बांधायचे आणि त्याची मनोभावे पूजा केली कि विवाह जमतो असा लोकांचा अनुभव आहे. इतकेच नव्हे तर या हळकुंडाची पूजा केली कि साऱ्या मनोकामना पूर्ण होतात असेही सांगितले जाते. या गणपतीच्या गाभारयात हळकुंडाच्या माळा वहिल्या जातात आणि गुरुवारी गणेशाला वाहिलेली ही हळकुंडे प्रसाद म्हणून इच्छुक भाविकांना दिली जातात.

Leave a Comment