राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी आज आनंदाच्या वातावरणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. कोरोनाचे संकट असले तरी नियमांचे पालन करून नागरिक आनंदाने गणेश चतुर्थी साजरी करत आहेत. सणाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती कोविंद यांनी लिहिले की, गणेश चतुर्थीच्या देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा सण भारतीय लोकांच्या अदम्य उत्साह, आनंद आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या संयमाचे प्रतिक आहे. विघ्नहर्ताच्या कृपेने आपण कोव्हिड-19 चे संकटावर मात करू.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूपखूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया! तुम्हा सर्वांवर श्री गणेशाचा आशिर्वाद कायम राहावो. सर्वत्र आनंद आणि समृद्धी राहो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील गणरायाचा फोटो शेअर करून सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

राहुल गांधींनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत लिहिले की, आज संपूर्ण देशाला मंगलकर्ता-विघ्नहर्ताच्या आशीर्वादाची गरज आहे.