रशियाने केले कोरोना लसीचे 100 लोकांवर ट्रायल, समोर आला रिपोर्ट

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधल्याचा दावा रशियाने केला होता. रशियाच्या स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी वेक्टरतर्फे तयार करण्यात आलेल्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये अनेक स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. ज्या स्वयंसेवकाना लस टोचण्यात आली होती त्यांचा रिपोर्ट आला असून, त्या सर्वांना स्वस्थ व चांगले वाटत आहे.

रशियाच्या रोसपोट्रेब्नॅड्जर संघटनेने सांगितले की, ट्रायलमध्ये सर्व सहभागी स्वयंसेवकांना लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 14 आणि दुसऱ्या टप्प्यात 43 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. याशिवाय प्लेसेबो कंट्रोल ग्रुपच्या आणखी 43 स्वयंसेवकांना लस टोचली.

रोसपोट्रेब्नॅड्जरने सांगितले की, 100 स्वयंसेवकांपैकी 6 जणांना इंजेक्शनच्या जागेवर थोडीशी वेदना झाली. मात्र इतरांना काहीही त्रास झाला नाही. क्लिनिकल ट्रायल सप्टेंबरपर्यंत पुर्ण करण्याची योजना असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, रशियात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे 4870 नवे रुग्ण समोर आले आहेत व 90 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 लाखांच्या पुढे गेला आहे.