राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

माजी अर्थ सचिव राजीव कुमार यांची नवीन निवडणूक आयोग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते अशोक लवासा यांची जागा घेतील. कायदा मंत्रालयाने याबाबत सूचना जारी करत सांगितले की, राष्ट्रपतींना त्यांना पदभार स्विकारण्यासाठी व त्यांच्या नियुक्तीसाठी मंजूरी दिली आहे.

अशोक लवासा यांनी राजीनामा दिला आहे. ते आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारी सांभाळणार आहेत. राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहे. सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत. अशोक लवासा यांच्या व्यतिरिक्त सुशील चंद्रा हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. राजीव कुमार हे 10 दिवसांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमचा भाग होतील.

कुमार यांच्याकडे सार्वजनिक धोरण आणि प्रशासकिय सेवेचा 30 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. त्यांनी बीएससी आणि एलएलबीसोबत पब्लिक पॉलिसी अँड सस्टेनेबिलिटीमध्ये मास्टर्स केले आहे. त्यांना मागील वर्षी जुलैमध्ये अर्थ सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. राजीव कुमार हे 2025 पर्यंत आपल्या पदावर राहतील. यानुसार ते लोकसभा निवडणूक 2024 चे काम देखील पाहतील.