कोरोनामुळे अत्यंत गरीब होऊ शकतात 10 कोटींपेक्षा अधिक लोक – जागतिक बँक

कोरोना व्हायरस महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या असून, लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे लोकांना अत्यंत गरीबीचे जीवन जगावे लागू शकते असे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालापास म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे जगभरातील 10 कोटींपेक्षा अधिक लोकांना गरीबीत जगण्यासाठी भाग पडू शकते.

जागतिक बँकेने चेतावणी दिली आहे की, महामारी दिर्घकाळ राहिल्यास हा आकडा अधिक वाढेल. याआधी डेव्हिड मालपास यांनी एका रिपोर्टचा संदर्भ देत सांगितले होते की, सध्याच्या अंदाजानुसार 2020 मध्ये 6 कोटी लोक दारिद्य्र रेषेखाली जातील. हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मालपास म्हणाले की, श्रीमंत देशांनी गरीब देशांच्या मदतीसाठी पुढे यावे. असे केल्यानेच एवढ्या मोठ्या लोकसंख्येला प्रभावित होण्यापासून वाचवता येईल. मात्र असे करताना श्रीमंत देश गरीब देशांचे शोषण देखील करू शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

दरम्यान, जागतिक बँकेने जगाभरातील 100 गरीब देशांसाठी जून 2021 पर्यंत 12 लाख कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केलेली आहे.