अमेरिकेच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दिसून आले सकारात्मक परिणाम


वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर कोरोनाचे दुष्ट संकट ओढावलेले असतानाच या संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत आहेत, त्याचबरोबर कोरोनाची लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर कोरोनापासून बचावासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर संस्थांकडून काही मार्गदर्शकतत्वे जारी केली जात आहेत.

दरम्यान अमेरिकेतील कंपनी फायजर आणि जर्मनीची कंपनी बायएनटेककडून तयार करण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. फायजर कंपनीने याआधीही कोरोना लसीबाबत एक माहिती प्रकाशित केली होती. त्यानुसार ट्रायलदरम्यान दिसून आले की, लसीच्या पहिल्या ट्रायलमध्ये सहभागी असलेल्या लोकांपेक्षा दुसऱ्या लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या ५० टक्के स्वयंसेवकांवर लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत.

यासंदर्भात डेलीमेलने दिलेल्या रिपोर्टनुसार कोरोनाची लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की लसीच्या दुसऱ्या ट्रायलचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. कारण दुसरी लस रोगप्रतिकारकशक्ती चांगली बनवण्यासाठी प्रभावी ठरल्यामुळे स्वयंसेवकांवर कोणतेही साईड इफेक्टस दिसून आलेले नाहीत. यासंदर्भात medRxiv.org वर प्रकाशित करण्यात आलेल्या माहतीनुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत लस दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढले होते.

लस विकसित करणारे सिनियक वा प्रसिडेंट विलियम ग्रुबर यांनी दिलेल्या माहितीनुसार जितक्या प्रमाणात शरीराला लस सुट होईल, त्या प्रमाणात कार्यक्षमता वाढेल. BNT162b1 (B1) आणि BNT162b2 (B2) या दोन्ही लसी प्रभावी असल्याचे विलियम ग्रुबर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

१८ ते ५५ वयोगटातील लोकांना चाचणीदरम्यान B1 लस देण्यात आल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये ५० टक्के सौम्य साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. काही प्रमाणात साईड इफेक्ट्स ६५ ते ८५ वर्षांच्या लोकांमध्ये दिसून आले आहेत. दुसरी लस दिल्यानंतर १८ ते ५५ वयोगटातील लोकांमध्ये १६.७ टक्के साईड इफेक्ट्स दिसून आले. ६५ ते ८५ वयोगटातील लोकांवर कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नाहीत.