पर्युषण पर्व; सर्वोच्च न्यायालयाची मुंबईतील जैन मंदिरे उघडण्यास परवानगी

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, सणांवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळत आहे. गणेशोत्सवावर देखील कोरोनाचे संकट पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे मंदिर उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आता मुंबईतील 3 जैन मंदिरांत भाविकांना पर्युषण प्रार्थना करण्यास परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरांना 22, 23 ऑगस्ट रोजी उघडण्याची परवानगी दिली आहे.

याशिवाय मुख्य न्यायाधीश एसए बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ही परवानगी कोणत्याही अन्य मंदिर किंवा गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमास लागू असणार नाही. कारण यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. न्यायालयाने सांगितले की, गणपती उत्सवासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.