संकटात अडकले किम जोंग उन, बहिणीला सोपवली महत्त्वाची जबाबदारी

कोरोना व्हायरस महामारी आणि जागतिक प्रतिबंध यामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. यामुळे येथील हुकुमशाह किम जोंग उन संकटात अडकले आहे. त्यामुळे किंम जोंग यांनी अमेरिकेसोबत संबंध सुधारण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्या बहिणीला दिली आहे. किम जोंग यांनी पक्षातील नेत्यांच्या एका सभेत सांगितले की, देशाला अनपेक्षित आणि अटळ आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामुळे विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात उशीर होत आहे.

या बैठकीत खराब अर्थव्यवस्थे मागचे सर्वात मोठे कारण निर्बंध असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पूर आणि कोरोना व्हायरस महामारीने उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला दोन दशकातील सर्वात खराब स्थितीमध्ये पोहचवले आहे.

उत्तर कोरियाच्या या स्थितीबाबत दक्षिण कोरियाच्या पत्रकारांनी सांगितले की, किम जोंग यांनी सियोल आणि वॉशिंग्टनसोबत संबंध चांगले करण्यासाठी आपली बहिण किम यो जोंगला जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपुर्वी एका राजकीय प्रकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावली.

आंतरराष्ट्रीय आपत्ती ग्रुपचे ईशान्य आशिया आणि परमाणू धोरणाचे वरिष्ठ सल्लागार ड्योन किम यांनी शंका व्यक्त केली की किम हे सर्वोच्च नेता म्हणून आपल्या अधिकारांचा त्याग करतील. उत्तर कोरियामधील सत्तेचे आशिंक हस्तांतरण अतिशयोक्ती असल्याचे दिसून येते.