यामुळे 25 वर्षांनी बंद होत आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर

मायक्रोसॉफ्टचे वेब ब्राउजर इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, कंपनी 2021 पासून इंटरनेट एक्सप्लोरर आणि लिगेसी एज व्हर्जनला सपोर्ट देणे बंद करेल. मात्र याचा अर्थ युजर्स इंटरनेट एक्सप्लोररचा वापरच करू शकणार नाहीत, असा नाही. कंपनी ब्राउजरला कोणतेही अपडेट देणार नाही.

जगभरातील विंडोज लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर डिफॉल्ट स्वरूपात मिळते. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की याचा उपयोग 5 टक्क्यांपेक्षा कमी लोक करतात. इंटरनेट एक्सप्लोररला कंपनी 30 नोव्हेंबरपासून सपोर्ट देणे बंद करेल. तर लिगेसी एज व्हर्जनला मार्च 2021 नंतर अपडेट मिळणार नाही.

मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोररला 16 ऑगस्ट 1995 ला रिलीज केले होते. हे ब्राउजर विंडोज 95 सोबत अ‍ॅड ऑन पॅकेजसह सादर करण्यात आले होते. या ब्राउजरची प्रोग्रामिंग लँग्वेज सी प्लस प्लस आहे. तब्बल 25 वर्षांनंतर हे ब्राउजर आता बंद होत आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने यावर्षी जानेवारीमध्ये क्रोमियम आधारित एज ब्राउजरचा प्रिव्ह्यू जारी केला होता. मे 2021 पर्यंत हे ब्राउजर सर्वांसाठी जारी केले जाईल. क्रोमियम आधारित मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर विंडोज आणि मॅकओएसमध्ये सपोर्ट करेल.