कोरोना काळात निवडणुका घेण्यासाठी आयोगाने जारी केल्या गाइडलाइन्स


नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने गाइडलाइन्स जारी केल्या असून त्यानुसार मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि थर्मल स्कॅनरसारख्या वस्तु निवडणुकीदरम्यान महत्वाच्या असतील. त्याचबरोबर ऑनलाइन नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुविधादेखील आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या गाईडलाइन्सनुसार निवडणुकीवेळी कोणत्याही कामादरम्यान मास्क घालावा लागेल. निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे रुम, हॉल किंवा कोणत्याही परिसरावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायजर, साबण आणि पाणी ठेवावे लागेल. त्याचबरोबर प्रत्येकाची स्कॅनिंग होईल. सरकारी निर्देशांनुसार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल. यासाठी मोठा हॉल किंवा परिसराचा वापर करावा लागेल. निवडणूक अधिकारी, सुरक्षेतील कर्मचारी यांच्यासाठी ट्रांसपोर्टेशनदरम्यान वाहने ठेवणे गरजेचे असेल.

ईव्हीएम/व्हीव्हीपॅटबाबत जारी केलेल्या नियमावली नुसार पहिल्या आणि दुसऱ्या ईव्हीएमसंबंधित प्रत्येक काम मोठ्या हॉलमध्ये व्हायला हवे. सॅनिटायजरचा मुबलक प्रमाणात पुरवठा करावा लागेल. ईव्हीएम/व्हीव्हीपॅटला सांभाळणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ग्लोव्हज घालावे लागतील.

निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी जारी केल्या नियमांनुसार नॉमिनेशन फॉर्म ऑनलाइन दिले जातील. उमेदवार फॉर्म ऑनलाइनदेखील भरू शकतात. शपथपत्रही ऑनलाइन भरता येईल. त्याची प्रिंट आपल्याकडे ठेवता येईल. नोटरीकरणानंतर त्याला निवडणूक अर्जासोबत अधिकाऱ्याला देता येईल. उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने डिपॉझिट भरू शकतील. नॉमिनेशन फॉर्म भरताना उमेदवारासोबत दोनपेक्षा जास्त लोक नसावेत. त्यांना दोनपेक्षा जास्त गाड्या घेऊन फिरण्याची परवानगी नसेल.उमेदवारांना वेगवेगळ्यावेळी बोलवण्यात येईल.

मतदान केंद्रासाठी असलेल्या नियमावलीनुसार एका पोलिंग बूथवर 1500 ऐवजी 1000 मतदार बोलवले जातील. मतदानापूर्वी पोलिंग स्टेशन सॅनिटाइज केला जाईल. प्रत्येक बुथच्या एंट्री पॉइंटवर थर्मल स्कॅनर लावला जाईल. प्रत्येकाची थर्मल स्क्रिनींग होईल. ज्या मतदाराचे तापमान जास्त असेल, अशांना शेवटच्या तासात मतदान करता येईल.