मोदींनंतर आता अक्षय कुमारसोबत जंगलातील खतरनाक प्रवासाला निघाला बेअर ग्रिल्स

बॉलिवूड अभिनेता लवकरच आपल्या खास अंदाजात लोकांचे मन जिंकण्यासाठी तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता रजनीकांत यांच्यानंतर आता अक्षय कुमार जंगलातील खतरनाक प्रवासाला निघाला आहे. अक्षय लवकरच बेअर ग्रिल्ससोबत इंटू द वाइल्ड कार्यक्रमात सहभागी होणार आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार बेअर ग्रिल्ससोबत धोकादायक जंगलातून प्रवास करताना दिसेल.

अक्षयने आपल्या या एपिसोडचे मोशन पोस्टर शेअर करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. पोस्टर शेअर करत अक्षयने लिहिले की, तुम्हाला वाटत असेल की मी वेडा आहे. मात्र केवळ जंगलात जाण्यासाठी वेडा आहे.

मोशन पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि बेअर ग्रिल्स कधी नदीत तर कधी झाडांना लटकलेले दिसत आहे. हा एपिसोड 11 सप्टेंबरला डिस्कवरी चॅनेलवर पाहण्यास मिळेल. कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये या एपिसोडचे शुटिंग झाले आहे. अक्षयच्या आधी पंतप्रधान मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत देखील या शो मध्ये दिसले होते.