Airtel च्या ‘या’ भन्नाट ऑफरमुळे तुम्ही एका वर्षापर्यंत ‘फ्री’मध्ये पाहू शकता टीव्ही


आपल्या युझर्ससाठी एअरटेलने एक भन्नाट ऑफर आणली असून त्यानुसार एअरटेल डिजीटल आपल्या निवडक टीव्हीच्या ग्राहकांना Xstream Premium हा प्लॅन एक वर्षापर्यंत मोफत देत आहे. आपल्या निवडक ग्राहकांना कंपनीकडून मेसेज पाठवून याबाबतची माहिती दिली जात आहे. अनेक युजर्सनी ट्विटरवर अशाप्रकारचा मेसेज आल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले असून याबाबत कस्टमर सपोर्टने स्पष्ट माहिती देण्याची मागणी अनेकांनी केली आहे.

तुमच्या अकाउंटवर एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम प्लॅन 365 दिवसांसाठी सुरू झाला असून याद्वारे एअरटेल एक्स्ट्रीम स्मार्ट स्टिकवर 10,000 पेक्षा जास्त चित्रपट, टीव्ही शो आणि अन्य कॉन्टेंट पाहता येईल, अशा आशयाचे मेसेज युजर्सना कंपनीकडून पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे नॉन-एक्स्ट्रीम बॉक्स किंवा स्मार्ट स्टिक युजर्सनाही एअरटेल डिजिटल टीव्हीकडून अशाप्रकारचे मेसेज येत आहेत. अशाप्रकारचे मेसेज एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स आणि नॉन एक्स्ट्रीम बॉक्स या दोन्ही युजर्सना येत आहेत. पण, ही ऑफर केवळ एअरटेल एक्स्ट्रीम स्मार्ट स्टिक युजर्ससाठी आहे की सामान्य DTH ग्राहकांनाही याचा लाभ मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावर कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसल्यामुळे ऑफरसाठी ग्राहकांची कशाप्रकारे निवड केली जात आहे, हे देखील अद्याप गुलदस्त्यातच आहे.