कोरोना : कुरापत करणाऱ्या नेपाळच्या मदतीसाठी पुढे आला भारत, करणार ‘रेमडेसिव्हिर’चे निर्यात

भारत कोरोनावरील उपचारासाठी महत्त्वाचे ठरलेल्या रेमडेसिव्हिर औषधाचे निर्यात नेपाळला करणार आहे. भारताच्या तीन कंपन्या नेपाळला या कोरोनावरील परिणामकारक औषधाचा पुरवठा करतील. औषध प्रशासन विभागाचे महासंचालक नारायण प्रसाद ढकाल म्हणाले की, आम्ही रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्यासाठी तीन कंपन्या निश्चित केल्या आहेत. यात माइलान, सिप्ला आणि हेटेरो या कंपन्या आमच्या मागणीनुसार पुरवठा करतील.

ढकाल यांनी सांगितले की, माइलानने नेपाळला अँटीव्हायरल औषध देण्यास सुरुवात केली आहे. नेपाळच्या बाजारात रेमडेसिव्हिरची किंमत जवळपास प्रति कूपी 7,800 नेपाळी रुपये आहे. भारतातून निर्यात केल्याने पैशांची बचत होईल. भारतीय कंपन्यांपर्यंत पोहचणे देखील सोपे आहे व खर्च देखील कमी येतो.

रेमडेसिव्हिर आयसीयूमध्ये असलेल्यांना दिले जाते. नेपाळच्या औषध प्रशासन विभागाचे महासंचालकांनुसार, भारतीय कंपन्या नेहमीच नेपाळला ड्रग्स आणि फार्मास्यूटिकल्स निर्यात करण्यासाठी पुढे राहिलेल्या आहेत.