धक्कादायक! तब्बल 23.5 कोटी सोशल मीडिया युजर्सचा डेटा लीक

जगभरातील 23.5 कोटी इंस्टाग्राम, युट्यूब आणि टीक-टॉक युजर्सची खाजगी माहिती सार्वजनिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या डेटी लीकची माहिती सिक्युरिटी रिसर्च कंपनी कॉमपॅरिटेकने दिली आहे. नुकतेच डार्कवेबच्या फोरमवर 15 बिलियन लॉग इन डिटेल्स लीक झाले होते. यातील 386 मिलियन डेटा हॅकरने सार्वजनिक केला होता.

या डेटा लीकमध्ये 100 मिलियन इंस्टाग्राम युजर्सची माहिती लीक झाली आहे. ज्यात युजर्सच्या प्रोफाईलचा समावेश आहे. तर 42 मिलियन टीक-टॉक युजर्स आणि 4 मिलियन युट्यूब युजर्सची खाजगी माहिती लीक झाली आहे. लीक झालेल्या प्रोफाईलचे नाव, खरे नाव, प्रोफाईल फोटो, अकाउंट डिस्क्रिप्शन, अकाउंट मॅनेजमेंट, फॉलोअर्सची संख्या, फॉलोअर्स ग्रोथ रेट, लोकेशन आणि लाईक्सचा समावेश आहे.

या माहितीचा वापर करून हॅकर्स ब्लॅकमेल करू शकतात. याशिवाय युजर्सचे नाव आणि प्रोफाईलचा चुकीच्या कामासाठी वापर करू शकतात. हा डेटा कसा लीक झाला याची अद्याप अचूक माहिती मिळालेली नाही. मात्र यामागचे कारण अनसिक्युर डेटाबेस असल्याचे सांगितले जाते.