समुद्रात टर्कीच्या हाती लागला मोठा खजिना, बदलून जाईल देशाचे चित्र

काश्मिर मुद्यावरून भारताचा विरोध करणाऱ्या टर्कीच्या हाती मोठा खजिना लागला आहे. हा खजिना टर्कीचे संपुर्ण चित्र पालटून टाकेल. टर्कीच्या काळ्या समुद्रात नैसर्गिक गॅसचा मोठा भंडार सापडला आहे. या गॅसच्या भंडाराला शोधणाऱ्या 2 लोकांनी याची माहिती दिली असून, टर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोआन यांनी देखील याचे संकेत दिले आहेत.

टर्कीचे राष्ट्रपती म्हणाले की, देशवासियांनी मोठी आनंदाची बातमी दिली जाणार आहे. आशा आहे की यामुळे देशात एका नवीन युगाची सुरुवात होईल. त्यांच्या या माहितीनंतर डॉलरच्या तुलनेत टर्कीचे चलन लीरा आणि शेअर मार्केटने देखील मोठी उसळी घेतल्याचे पाहण्यास मिळाले. टर्कीच्या पेट्रोल रिफायनेरी एएस (तुप्रास) आणि पेट्रोलियम मॅन्युफॅक्चरिंग पेटकिम पेट्रोकिमया होल्डिंगच्या शेअर्सची किंमत 7.6 आणि 9.9 टक्क्यांनी वाढली.

मात्र, दुसरीकडे टर्कीने भूमध्यसागरात विवादित जलक्षेत्रात उर्जा भंडाराचा शोध लावल्याने यूरोपियन यूनियनसोबत वाद वाढू शकतो. टर्कीच्या उर्जा मत्र्यांनी सांगितले की, जुलै महिन्यात एरेगिलच्या जवळ तटाच्या क्षेत्रात टूना-1 झोनमध्ये खोदकाम सुरू केले होते. टूना-1 टर्कीच्या समुद्र तटापासून 150 किमी लांब आहे. याआधी देखील येथे गॅसचा साठा सापडलेला आहे. मात्र यावेळी हा साठा मोठा असल्याचे सांगितले जाते.