फुटलेल्या फोनचे आता टेंशन घ्यायचे नाही, कारण…

अनेकजण जूना फोन एक्सचेंज करून नवीन फोन घेत असतात. मात्र यासाठी तुमच्या फोनची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. खासकरून स्क्रिन फुटलेली असल्यास फोन एक्सचेंज होत नाही. परंतू आता स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने फुटलेल्या फोनसाठी खास ऑफर आणली आहे. सॅमसंगने आपल्या नवीन नोट20 सीरिजसोबत एक ऑफर आणली असून, या अंतर्गत ग्राहक फुटलेली स्क्रीन असलेला कोणताही स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता.

जर तुम्हाला नोट 20 सीरिजमधील कोणताही फोन खरेदी करायचा असल्यास, तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही फुटलेल्या स्क्रीनचा फोन एक्सचेंज करू शकता. सॅमसंग या फोनवर 5000 रुपयांपर्यंत सूट देईल. ही खास ऑफर 21 ऑगस्टपर्यंत प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. एक्सचेंज करण्यासाठी केवळ सॅमसंगचाच फोन असण्याची गरज नाही. तुम्ही इतर कंपनीचा फोन देखील बदलू शकता.

सॅमसंगने या ऑफरला अपग्रेड बोनस नाव दिले आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट20 सीरिजची सुरुवातीची किंमत 77,999 रुपये आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम मायगॅलेक्सी अ‍ॅपवर साइनइन करावे लागेल. यानंतर फुटलेल्या स्क्रीनचा एक बॅनर दिसेल. तुम्हाला एक्सचेंज करायचा असलेल्या फोनबाबत माहिती द्या. त्यानंतर ‘Check Now’ वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या फोनची किंमत दिसेल. तुम्ही तुमच्या जवळील सॅमसंगच्या स्टोरमध्ये जाऊन फोन एक्सचेंज करू शकता.