पुतिन यांच्या कट्टर विरोधकाला चहामधून विषप्रयोग

रशियाचे प्रमुख विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रपती व्लादिमिर पुतीनचे विरोधक अ‍ॅलेक्सी नवल्नी यांना विष देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सायबेरियामधून परतत असताना विमानात त्यांच्या चहामध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे.

इमर्जेंसी लँडिंगनंतर नवल्नी यांना ओमस्क येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्यात ते आयसीयूमध्ये असून, अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. अ‍ॅलेक्सी नवल्नी हे रशियात व्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

अ‍ॅलेक्सी सायबेरियाच्या तोमस्कवरून रशियाची राजधानी मॉस्कोला परतत होते. प्रवासात त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर इमर्जेंसी लँडिंग करत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दुसरीकडे अ‍ॅलेक्सी यांचे समर्थक आरोप करत आहेत की हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्याबाबत पुर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.