‘पुढील 6-7 महिन्यानंतर भारत नोकरी देण्यास सक्षम नसेल’, राहुल गांधींचा पुन्हा घणाघात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशातील बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. येणाऱ्या पुढील काही महिन्यात भारत युवकांना नोकरी देण्यास सक्षम नसेल, असा अंदाज राहुल गांधींनी व्यक्त केला आहे. व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, पुढील 6-7 महिन्यात रोजगाराचे संकट अधिक गंभीर होणार आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भारत युवकांना नोकरी देण्यास सक्षम नसेल. 70 वर्षात असे कधीच झाले नाही की आपला देश युवकांना नोकरी देण्यास सक्षम ठरला नाही. जेव्ही मी देशाला याबाबत सावध केले होते की कोव्हिड-19 मुळे देशाला मोठे नुकसान होईल. त्यावेळी मीडियाने माझी खिल्ली उडवली. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल, तर माझे ऐकू नका. आज मी सांगत आहे की आपला देश नोकरी देण्यास सक्षम नसेल. तुम्ही जर सहमत नसाल तर 6-7 महिने वाट पहा.

राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, 90 टक्के रोजगार असंघटित क्षेत्र, छोटे उद्योग आणि शेतकऱ्यांपासून आहे. सरकारने ते नष्ट केले आहे. एकामोगामोग एक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोराटोरियम कालावधी (moratorium period) संपल्यानंतर एमएसएमई देखील उद्धवस्त होईल.