नेपाळमध्ये आढळला दुर्मिळ सोनेरी कासव, विष्णूचा अवतार समजून दर्शन घेत आहेत लोक

नेपाळच्या धनुषा जिल्ह्यात दुर्मिळ असा सोनेरी कासव आढळला आहे. लोक या कासवाला पवित्र मानून त्याची पुजा करता आहेत. जेनेटिक म्यूटेशनमुळे हा कासव सोनेरी झाला आहे. मिथिला वाइल्डलाइफ ट्रस्टने हा कासव भारतील फ्लॅप कासव असल्याचे म्हटले आहे. या कासवाच्या शोधानंतर वन्यजीव विशेषज्ञ कमल देवकोटा म्हणाले की, या कासवाचे नेपाळमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

देवकोटा यांनी सांगितले की, काही लोकांचे म्हणणे आहे हा भगवान विष्णूंनी पृथ्वीला वाचविण्यासाठी कासवाच्या अवतारात जन्म घेतला आहे. हिंदू मान्यतेनुसार कासवाच्या वरच्या शेलला आकाश आणि खालच्या शेलला पृथ्वी मानले जाते.

दुसरीकडे देवकोटा यांच्या दाव्याच्या उलट तज्ञांचे म्हणणे आहे की, जिन्समधील बदलांमुळे कासवाचा रंग असा झाला आहे. याला क्रोमॅटिक ल्यूसिजम म्हणतात. यामुळे कासवाच्या वरच्या शेलचा रंग सोनेरी होतो. याच कारणामुळे प्राण्यांच्या त्वचेचा रंग पांढरा किंवा मध्यम होतो.

देवकोटा यांनी माहिती दिली की, नेपाळमध्ये सोनेरी रंगाचा हा पहिलाच कासव आहे. संपुर्ण जगात याप्रकारचे 5 कासव आढळले आहेत. आमच्यासाठी हा एक असामान्य शोध आहे. हा कासव पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत.