धोनीसाठी मोदींचे खास पत्र, व्यक्त केल्या भावना

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून धोनीचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी पत्रात लिहिले की, तुझ्यात नवीन भारताचे प्रतिबिंब दिसते. जेथे तरुणांचे नशीब त्यांच्या कुटुंबाचे नाव ठरवत नाही, तर ते स्वतःचे स्थान आणि नाव स्वतःच मिळवतात.

धोनीने पंतप्रधान मोदींचे हे पत्र शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. धोनीने पत्र शेअर करत लिहिले की, एक कलाकार, सैनिक आणि खेळाडूला कौतुकाची गरज असते. त्यांच्या मेहनतीचे आणि बलिदान ओळखले जावे जावे असे त्यांना वाटते. कौतुक आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद पंतप्रधान मोदी.

मोदींनी पत्रात लिहिले की, 15 ऑगस्ट रोजी एक साधा व्हिडिओ शेअर केला होता, जो उत्कट वादासाठी पुरेसा होता. 130 कोटी भारतीय निराश आहेत, मात्र त्यासोबतच मागील दीड दशकात भारतासाठी जे केले त्यासाठी आभारी देखील आहे. अवघड स्थितीमध्ये तुझ्यावरील निर्भरता आणि सामना संपवण्याचा अंदाज, खासकरून 2011 चा वर्ल्ड कप फायनल, अनेक पिढ्यांना लक्षात राहील.

मोदींनी लिहिले की, तुझ्या करिअरच्या आकड्यांकडे बघितल्यास दिसते की तू भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेस. भारताला जगातील नंबर 1 टीम बनविण्यासाठी तुझी भूमिका महत्त्वाची होती. क्रिकेटच्या इतिहासात, तुझे नाव जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये, सर्वोत्तम कर्णधारांमध्ये आणि अर्थातच सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये निश्चितच येईल.